समाज प्रबोधनाचे काम केले जाईल : रवींद्र बारस्कर

0
73

सावेडी गावठाण येथे खंडोबा मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन

नगर – शहराला धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला असून त्याचे जतन व्हावे यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुरातन काळातील खंडोबा मंदिरासमोर सभा मंडप उभा राहणार आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी भावी वर्ग मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. धार्मिकतेच्या माध्यमातून समाज जोडला जात असून संत महंतांचे विचार पोचवण्याचे काम होत असते. सभा मंडपाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले जाईल. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी दिला असून टप्प्याटप्प्याने प्रभागातील विकासाची कामे मार्गी लागत आहे. असे प्रतिपादन माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी केले. रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खा.सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावेडी गावठाण येथील खंडोबा मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे व सर्व सावेडी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रवींद्र बारस्कर, प्रदेश सदस्य किशोर वाकळे, विवेक नाईक, नितीन शेलार, अमित गटने, महादेव बारस्कर, विजयराव वाकळे, विठ्ठल बारस्कर, बबन बारस्कर, श्रीकांत वाकळे, अ‍ॅड महेश काळे, गणेश वाकळे, सचिन बारस्कर, अशोकराव वाकळे, भोरू बारस्कर, डॉ. बाळासाहेब भगत, संजय अडोळे, विलास वाकळे, संपत नलावडे, सदाशिव भिंगारदिवे, भगवान जगताप, भरत खाकाळ, किशोर बारस्कर, नारायण वाकळे, सुरेश वाकळे, बाळासाहेब वाकळे, रोहिदास बारस्कर, करण कराळे, बाळासाहेब बारस्कर, महेश कराळे, अभिषेक वाकळे, देविदास बारस्कर, कचरू बारस्कर, भानुदास बारस्कर, रमेश चव्हाण, दत्ता वाकळे, अरविंद वाकळे, प्रशांत कर्णवत, बाबासाहेब भिंगारदिवे, संतोष दंडवते, रावसाहेब करपे, पप्पू आडोळे, प्रदीप चेमटे, पुष्कर कुलकर्णी, भैय्या बारस्कर, चंदू भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, रोहन बारस्कर, अक्षय बारस्कर, मयूर वाकळे, राम बारस्कर, अवधूत बारस्कर, नारायण वाकळे इत्यादी उपस्थित होते. अभय आगरकर म्हणाले, खंडोबा मंदिर पुरातन व ऐतिहासिक आहे या ठिकाणी भाविक वर्षभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. रवींद्र बारस्कर यांनी मंदिरासमोर सभा मंडप उभारावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भाजपच्या माध्यमातून विकासाच्या योजना नियोजनबद्ध व कायमस्वरूपी राबवल्या जात असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन भगवान जगताप यांनी केले. आभार महेश काळे यांनी मानले.