नगर – अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाची सांगता झाली. उत्तुंग आम्ही, या तीन दिवशीय ’थेाशप’ी डीींशशीं’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये योगा एस्पर्ट डॉ. निशा गोडसे यांनी विविध आसने, फेस योगा, ध्यान याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर झुम्बा एसपर्ट उजठए ऋखढछएडड च्या सोनल मदन यांनी झुंम्बा घेतला. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांनी बॉलीवुड, गाण्यांवर ठेका घरत, मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मैदानावर विविध मैदानावर स्टॉल, लावण्यात आले होते. त्यामध्ये महिलांचे ड्रेसेज, हॅण्डमेड ज्वेलरी, मंडल आर्ट सारख्या कलाकृतीजा, इनडोर प्लॅटन्स यांचे स्टॉल्स होते. तर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी जवळ जवळ ५० च्या वर फुड स्टॉल लावले होते. यामध्ये पाणीपुरी, सर्व प्रकारचे चाट, चाईनीज, बर्गर, सॅण्डवीच, सर्व प्रकारचे केक, नुडल्स, मोमोज, कोकम सरबत, फुट ज्युसचा समावेश होता. नगरमधील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील मुली व महिला उपस्थित होत्या. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद लुटत, भरपूर खरेदी करून निघताना मेहंदी व नेल आर्ट करून अगदी आनंदित झाल्या. कार्यक्रमात सेल्फी पॉईट आणि ट्रेक कॅम्पच्या स्ट्रॉलच्या स्लीपिंग बॅग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. वुमन स्ट्रीटचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनी चा विशेष सत्कार प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये महाविद्यालयातील एन. सी. सी. ची विद्यार्थिनी साक्षी कुमारी हीची प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनासाठी निवड झाली. तर विद्यार्थिनी फिरदोस सय्यद हिस महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट स्वयंसेवकाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, तृतीय विद्यार्थिनी साजरी परदेशी हिने चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महिला कक्ष प्रमुख प्रा. रुणली कुलकर्णी, प्रा. संध्या हिरे, प्रा. प्रा. सय्यद नजमुश्श्यार, प्रा. इरम शेख, प्रा. आलिया पठाण यांनी विशेष परीश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या सागडे यांनी केले.