शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणच्या दोघांना पकडले

0
73

नगर – शेतातील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून पुन्हा बसविण्याकरिता विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी दीड हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा तालुयातील बेलवंडी सेशन येथे शुक्रवारी (दि.१) ही कारवाई करण्यात आली. प्रधान तंत्रज्ञ सुनील मारुती शेळके (वय ४५, रा. थोरात वस्ती, वाडेगव्हाण, ता.पारनेर) व बाह्यस्रोत तंत्रज्ञ वैभव लहु वाळके (वय २२, रा. बेलवंडी) अशी दोघांची नावे आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी वाळके याने शेळके याच्याकरिता व स्वतः करिता दीड हजार रुपये लाच मागितली. शुक्रवारी (दि.१) पडताळणी होऊन त्याच दिवशी वैभव वाळके याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच, सुनील शेळके यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार बाबासाहेब कराड, रवी निमसे, किशोर लाड, संतोष शिंदे, सना सय्यद, चालक पो.हे.कॉ. हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.