एसीबी कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी

0
54

नगर – नगर शहरातील सर्जेपुरा परिसरात हॉटेल मिलन समोर लावलेली हिरो कंपनीची एच. एफ. डिलस मोटारसायकल (क्र. एम.एच.१६ सी पी ०३२७)अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत प्रकाश एकनाथ भोसले (रा. शेंडी, ता.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोसले हे त्यांच्या पत्नी समवेत मंगळवारी (दि.२०) दुपारी सर्जेपुरा परिसरात भरणार्‍या मंगळवार बाजारात खरेदी साठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. त्यांनी २ दिवस मोटारसायकलचा शोध घेवून ती न सापडल्याने त्यांनी गुरुवारी (दि.२२) दुपारी फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.