मर्चंट्स बँकेच्या सुवर्णमहोत्सवी समारोप कार्यक्रमाची पहिली निमंत्रण पत्रिका श्री विशाल गणपती चरणी

0
86

नगर – अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँकेच्या सुवर्णम होत्सवी वर्षाचा समारोप २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १.१५ वाजता केशरगुलाब मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची पहिली निमंत्रण पत्रिका बँकचे संचालक आनंदराम मुनोत यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री विशाल गणपती चरणी अर्पण करण्यात आली. यावेळी व्हा. चेअरमन अमित मुथा, संचालक संजय बोरा, किशोर मुनोत, विजय कोथिंबीरे, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी उपस्थित होते. आनंदराम मुनोत म्हणाले, मर्चंटस बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध उपक्रम राबवून साजरे करण्यात आले. यात सभासद, ग्राहक, ठेवीदारांना सहभागी करुन घेण्यात आले. आता सुवर्णमहोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे. याच कार्यक्रमात बँकचे संस्थापक तथा चेअरमन हस्तीमल मुनोत यांचा सहकारी बँकिंग क्षेत्रातील ५६ वर्षांच्या योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहकारयात्री उपाधीने गौरव करण्यात येणार आहे. बँकेसाठी हा अनमोल क्षण असणार आहे. बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.