पोलिसांबद्दल गैरउद्‌गार काढणारे आ. नितेश राणेवर कारवाई करावी

0
62

नगर – काही राजकीय वरदहस्त असणारे व्यक्ती वारंवार काही वाईट प्रवृत्तीचे लोक हे पोलीस व पोलीस कुटुंबीय यांच्याबद्दल कायम अपशब्द वापरतात तसेच आमदार नितेश राणे यांनी एका जाहीर सभेत वक्तव्य केलेले आहे की, पोलीस माझे काहीच बिघडू शकत नाही माझे साहेब सागर बंगल्यावर बसलेले आहे असे सांगून १८ फेब्रुवारी रोजी अकोल्या जिल्ह्यातील निंबा फाटा येथे परत एकदा पोलिस व त्यांच्या कुटुंबाबद्दल जाहीर सभेत प्रक्षोभक भाषण केले त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस आमच्या राज्यात काय कार्यवाही करणार? पोलिसांना जागेवर राहायचे की नाही ते माझ्या भाषणाचे चित्रकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील पोलीस माझे काही बिघडू शकत नाही. असे चित्थावणी खोर वक्तव्य करून पोलीस व पोलीस कुटुंबीयांचा कमीपणा येइल, असे प्रक्षोभक भाषण केल्याने आमदार नितेश राणे यांच्यासह पोलिसांवर बोलणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगरच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत उजागरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.