मराठा नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन व शिवजयंतीनिमित्त उपक्रमजिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त व शिवजयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड येथील चौकात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ आदी.
जयंतराव वाघ यांचे प्रतिपादन नगर – शिवजयंतीच्या निमित्ताने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवून मराठा पतसंस्थेने नवा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ यांनी केले. मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्यावतीने २३ व्या वर्धापन दिनानिमित्त व शिवजयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड येथील चौकात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ, उद्योजक मुकेश मुळे व राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राचार्य मच्छिंद्र तांबे, उद्योजक दीपक जाजू, सेवा संघाचे जेष्ठ पदाधिकारी सोपानराव मुळे उपस्थित होते. पुढे बोलतांना जयंत वाघ म्हणाले, पतसंस्था गेली २३ वर्ष सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक काम करीत आहे. अशा पतसंस्थेच्या मागे समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. माणुसकीची भिंत या उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून दिले आहे. यावेळी मुकेश मुळे म्हणाले, माणुसकीची भिंत या उपक्रमातून समाजाकडे जे आहे जे वापरात नाही, असे कपडे गरजवंतांना उपलब्ध करून देणे हे मोठे काम या संस्थेने केले आहे, असे गौरवोद्गार काढले. प्रारंभी स्वागत करताना उपाध्यक्ष किशोर मरकड म्हणाले, गेली २३ वर्ष मराठा पतसंस्था ही आर्थिक चळवळी बरोबर सामाजिक चळवळीतही अग्रेसर आहे. दरवर्षी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यास समाजही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतो. सूत्रसंचालन संचालक सतीश इंगळे यांनी केले तर आभार संचालक बाळासाहेब काळे यांनी मानले. यावेळी संचालक लक्ष्मण सोनाळे, अॅड. राजेश कावरे, उदय अनभुले, अच्युत गाडे, राजेंद्र ढोणे, डॉ. कल्पनाताई ठुबे, राजश्रीताई शितोळे, ज्ञानदेव पांडुळे, किसनराव पायमोडे, द्वारकाधीश राजेभोसले, अॅड. रवींद्र शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, संतोष म्हस्के, सुदाम मडके, प्रियांक बेलेकर, मनोज तळेकर, माजी संचालक संपतराव साठे आदी उपस्थित होते. यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह व्यवस्थापक बबन सुपेकर, गोरख काटे, शाखाधिकारी अनुपमा भापकर, पुष्पा इंगळे, प्रितेश बोरुडे, रणजीत रक्ताटे, प्रशांत बोरुडे, शशिकांत बोरुडे, तेजस कासार, मनीष रोहकले, शुभम कोतकर कविता ढोणे, दीपमाला पवार यांनी परिश्रम घेतले.