छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणूक ‘नगरकरांचे आकर्षण’ ठरते : आमदार संग्राम जगताप

0
55

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातुन जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणारी मिरवणूक नगरकरांचे आकर्षण ठरत असून यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी विविध वेशभूषा साकारत आपल्या पारंपरिक कला, नृत्य सादर करतात, तसेच विचिध विषयांवरील समाज प्रबोधनाचे देखावे सादर करतात त्या माध्यमातून खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजात पोहोचवण्याचे काम होत आहे, युवा पिढीने शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले. शिवजयंती निमित्त आ. संग्राम जगताप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब पवार, निखिल वारे, प्रा.सीताराम काकडे, ज्ञानेश्वर काळे, सागर गुंजाळ, संपत नलावडे, जयंत वाघ, संजीव भोर, विवेक नाईक, गीतांजली काळे. पल्लवी जाधव, आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.