कामगार, शेतकरी तसेच लोकविरोधी कारभाराचा निषेध म्हणून देशव्यापी संप व मोर्चा

0
29

नगर – केंद्रीय कामगार संघटना फेडरेशन असोशिएन्स व संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी तसेच लोकविरोधी धोरणांच्या विरोधात १६ फेब्रुवारीला एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने या संपाचा भाग म्हणून सकाळी ११ वाजता गांधी मैदान येथून मार्चास सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा तांबोळी हॉस्पीटल, बेडेकर लास – आशा टॉकीज – दवा बाजार – माणिक चौक – अर्बन बँक चौक- नवी पेठ मार्गे परत गांधी मैदान येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्चामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

नविन चार श्रम संहिता रद्द करून जुनेच कामगार कायदे आणावेत तसेच सर्व कामगारांना किमान २६ हजार रु वेतन, १० हजार रुपये पेन्शन मिळावी तसेच बोनस व कर्मचारी आरोग्य विम्यावरील मर्यादा काढून टाकाव्यात या व इतर मागण्या घेऊन वैद्यकीय प्रतिनिधी या मोर्चात सहभागी व्हावे झाले होते. मोर्चा संपल्यावर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ते.. सिद्धेश्वर कांबळे, दिपक पापडेजा, प्रकाश मुनोत, लक्ष्मण मिसाळ, दिपक शिंदे व संभाजी खोले यांनी प्रयत्न केले, तसेच सदर मोर्चासाठी प्रा. डॉ. महेबुब सय्यद, अ‍ॅड. बन्सी सातपुते, फिरोज शेख, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, संजय नांगरे, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.