वृद्धाश्रमातील वृद्धाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, मातोश्री वृद्धाश्रमात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा

0
35

अभिमन्यू जाधव मित्र मंडळ व जंगूभाई तालीमच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला.

नगर – अभिमन्यू जाधव मित्र मंडळ व जंगूभाई तालीमच्या वतीने विळद घाटातील नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित व प्रतिभा नवकर जैन प्रतिष्ठान, नगर संचलित मातोश्री वृद्धाश्रमात व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यावेळी येथील वृद्धाच्या चेहऱयावर हास्य फुलले. याप्रसंगी अभिमन्यू जाधव, रोनक बिचकर, रोहनभाई चावरे, दिनेश फिरके, कृणाल भिंगारदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवकांनी वृद्धांना ग्रीटिंग, गुलाब फुल व चॉकलेट दिले व त्याचाशी बातचीत केली त्याची चौकशी केली त्यामुळे त्यांना आनंद झाला व त्यांच्या चेहर्‍यावर हास्य उमटले वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया म्हणाले सध्या येथे २७ वृद्ध असून देणगीदाराच्या मदतीने हे चालवले जाते येथे वृद्धांना काहीही कमी पडू दिले जात नाही जाधव व त्याचे मित्र दरवर्षी न चुकता येथे या दिवशी येतात व प्रेमाचा दिवस यांच्या सोबत साजरा करतात, त्यांना हे वृद्ध आशीर्वाद देतात जाधव यावेळी बोलताना म्हणाले, प्रेमाचा व्याख्या बदलत असून ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्याना येथे राहावे लागते हे युवकांना समजावे त्यानी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा या येथून येथे प्रेमाचा दिवस साजरा करतो हा दिवस मुले-मुलींचा नसून सर्वांचा आहे आपले आई वडील, बहीण भाऊ, मित्र, धर्म, देशाबद्दल प्रेमाचा दिवस आहे या दिवशी मोठे गिफ्ट भेट देणे नसून त्याच्या भावना ओळखून आपण तसे वागले पाहिजे येथे येऊन मन भरून गेले आहे त्याच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून मन प्रसन्न झाले आहे असेही ते म्हणाले.