सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चौघांना पकडले

0
38

 

नगर – नगर शहरातील लेरा ब्रुस बॉईज हायस्कुल ग्राऊंड, कोठी या ठिकाणी रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत थांबून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून आरडाओरड, शांतता भंग, नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्याने चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बुधवारी (दि.१४) सायंकाळी माहिती मिळाली की, बॉईज हायस्कुल ग्राऊंड, लेरा ब्रुस, कोठी येथे काही इसम सायंकाळी व रात्रीचे वेळी उशीरापर्यंत थांबुन गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतात, तसेच आरडाओरडा करतात, त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकाला कारवाई साठी पाठविले. या पथकाने अमोल प्रदिप कदम (वय २४, रा. महादेव मंदीरासमोर, गांधीनगर, बोल्हेगाव), योगेश राम सटाले (वय २९, रा. चिपाडे मळा, सारसनगर), अनिकेत शंकर वाकळे (वय २१, रा. काटवन खंडोबा), सोमनाथ राजु केदारे (वय २०, रा. गांधीनगर, बोल्हेगाव), असे बॉईज हायस्कुल ग्राऊंड, लेरा ब्रुस, कोठी येथे वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसुन गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पकडले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांची सिव्हील हॉस्पीटल येथे वैद्यकीय अधिकारी यांचे कडुन वैद्यकीय तपासणी केली असता त्यात वर नमुद चारही इसमांनी गांजाचे सेवन केले असलेबाबत अहवाल दिलेला आहे. नमुद चारही इसमांचे विरुध्द एन.डी. पी.एस. कायदा कलम ८ (क), २७ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.हे.कॉ. तनवीर शेख, रवींद्र टकले, शाहीद शेख, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहकले, तान्हाजी पवार, सत्यजित शिंदे, सुरज कदम, अभय कदम, प्रमोद लहारे, शिवाजी मोरे, अतुल काजळे, महेश पवार, सुजय हिवाळे यांनी केली आहे. पोलिसांचे शहरातील जनतेस आवाहन शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणी गांजा अमली पदार्थ किंवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, धिंगाणा, शिवीगाळ असे कृत्य करत असल्यास तत्काळ कोतवाली पोलिसांना त्याची सविस्तर माहिती ०२४१ २४१६११७ या दूरध्वनी वर द्यावी व माहिती देणार्‍याचे त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शहरातील जनतेस केले आहे.