वारूळाचा मारुती परिसरातील घटना; तिघा जणांवर गुन्हा दाखल
नगर – वाढदिवसावरून घरी निघालेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.१४) पहाटे शहरातील वारूळाचा मारुती कमानीजवळ पडली. सचिन मुरलीधर ठाणगे (वय २९ रा. दातरंगे मळा, वारूळाचा मारुती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमरत्न भिंगारदिवे (रा. वारुळाचा मारुती), राहुल रोहकले (रा. नालेगाव), गणेश भुजबळ (रा. दातरंगे मळा) असे आरोपींची नावे आहेत. मंगळवारी (दि. १३) फिर्यादीचा मित्र निखिल भिसे यांचा वाढदिवस होता. वारुळाचा मारुती कमानी जवळ वाढदिवस साजरा करून फिर्यादी, त्याचा मित्र अमित चित्राल व निखील भिसे हे घरी जाण्यासाठी निघाले असता तिघे आरोपी तेथे आले. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिले असता ओमरत्न त्याला म्हणाला की, तु माझ्याकडे का पाहतो. असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरु केली व लाथा बुयांनी मारहाण करत कोयत्याने वार करून जखमी केले. राहुलने लाकडी दांडयाने व गणेश ने लाथाबुयांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.