अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक ‘मनसे’चे अमित ठाकरे यांनी लढवावी

0
55

नगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ हा अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे. त्यातच सध्याचे खा.डॉ. सुजय विखे यांचे काम सुध्दा असमाधानकारक आहे. सध्या त्यांचे मतदार संघात साखर, डाळ वाटपाचे काम सुरू आहे. त्याचे कार्यक्रम प्रत्येक गावात ते घेत आहे परंतु अनेक ठिकाणीं त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुजय विखे यांचे काम साखर, डाळ वाटपाचे नसुन जनतेला पाणी देण्याचे आहे, ते काम सध्या ते करत नाही आहेत हे दिसुन येते. जर अमित ठाकरे यांनी ही लोकसभा निवडणुक लढविली तर ते नक्कीच निवडून येतील. तसेच राज ठाकरेंची विकासाची दुरदृष्टी लक्षात घेता संपुर्ण दक्षिण लोकसभा मतदार संघातील मतदार भरघोस मते हे मनसेच्या पारड्यात टाकतील, त्यामुळे जिल्ह्यात मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढेल. अहमदनगर जिल्हा हा सहकार साखर सम्राटांचा जिल्हा आहे. अनेक दिग्गज नेते येथे होऊन गेले, आहेत परंतु म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांनी हि येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदार संघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी मागणी केली आहे.