भगवान परशुराम मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करू

0
126

सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आयोजित भगवान श्री परशुराम मंदिराचे भूमिपूजन करताना आ. संग्राम जगताप. समवेत माजी आ. अरुण जगताप, मंदारबुवा रामदासी, दत्तोपंत पाठक, महेश रेखे, सागर कुलकर्णी, बाळासाहेब पंढरपूरकर, प्रतिभाताई भोंग, राजाभाऊ पोतदार आदी.

नगर – भगवान श्री परशुराम मंदिराच्या व परशुराम भवनाच्या कामास पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सकल ब्राह्मण महासंघास सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन अहमदनगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी दिले. सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आयोजित भगवान श्री परशुराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. अरुण जगताप, श्री.देवदास स्वामी मठाचे श्री समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी, दत्तोपंत पाठक, वेदशास्त्र संपन्न महेश रेखे, सागर कुलकर्णी, बाळासाहेब पंढरपूरकर, निलेश धर्माधिकारी, ह. भ. प. श्रीमती प्रभाताई भोंग, सकल ब्राम्हण समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, समन्वयक विजय देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, अजिंय बोरकर, प्रा. माणिकराव विधाते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, जगताप कुटुंबीयांवर अध्यात्मिक विचारांचा पगडा आहे. त्यामुळे जे पूर्ण होणार नाहीत असे कुठलेही आश्वासन आम्ही कदापिही देत नाहीत. आपले आजोबा बलभीमराव जगताप यांच्या नावाने १ लाख ११ हजार रुपयांची देणगी तर उद्योजक राजेश भंडारी यांच्यावतीने २ लाख ११ हजार रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. तसेच मंदिराच्या व भवनाच्या बांधकामासाठी आपण शासकीय व खाजगी पातळीवरून सर्वोतोपरी सहकार्य करून हे भवन लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेऊ असे ते म्हणाले. समाज घडवण्याची मोठी जबाबदारी ब्राह्मण समाजावर आहे. संस्कारी पिढ्या घडवण्याचे काम ब्राह्मण समाजाला करायचे आहे. आपल्यावर इतर समाजाचा मोठा विश्वास असून, आगामी काळात या वास्तूतून अनेक नवीन साधुसंत घडतील व ही वास्तू लवकरच नावारूपाला येईल असे ते म्हणाले. मंदार बुवा रामदासी म्हणाले की, धर्मसत्ता व राजकीय सत्ता जेव्हा एकत्र येते तेव्हा समाजाचा उत्कर्ष होतो. ब्राह्मण समाज आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे सांगून तुम्ही फक्त तिकीट मिळवण्याची जबाबदारी घ्या, तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी ब्राह्मण समाज घेईल. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिरंजीव भगवान परशुराम होय. असे सांगून ब्राह्मण समाजाने एकत्र यावं, संघटित व्हावं, आळस झटकावा, परस्परांमधील गुणदोष न पाहता आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून कुणाचेतरी अनुकरण करावे, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. त्याचबरोबर आपले ध्येय आणि उद्दिष्टावर लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले. राजाभाऊ पोतदार म्हणाले की आ. अरुण काका जगताप व आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकारामुळे ब्राह्मण समाजाला परशुराम मंदिरासाठी जागा मिळाली व हे मंदिर व परशुराम भवन पूर्ण होण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभणार आहे. यानिमित्ताने ब्राह्मण समाजाची अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या स्वप्नाची पूर्ती झाली असे मी मानतो. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संपत बारस्कर, सुमित कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. पाहुण्यांच्या हस्ते श्री परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, मंदिराचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण झाले. यशवंत आंबेकर व सुपर्णा देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंगेश मिसळ यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास प्रा. मधुसूदन मुळे, प्रा. शिरीष मोडक, आदिनाथ जोशी, एन. डी. कुलकर्णी, प्रा. मोहन कामत, उद्योजक श्रीकृष्ण जोशी, सुरेश क्षीरसागर, उद्योजक मोहन नातू, चंद्रकांत रेणावीकर, दि. ना. जोशी, मिलिंद कुलकर्णी, डॉ. दिवाकर सुहास, सुवर्ण कुलकर्णी, श्रीधर बापट, डॉ. विजयकुमार भंडारी, प्रभाकर प्रताप यांच्यासह ब्राम्हण समाज उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, अरुण आवटी, नंदकुमार पोळ, जोत्सना कुलकर्णी, अभय जोशी, मिलिंद जोशी, किरण वैकर, श्रिया देशमुख, सुवर्णाताई महापुरुष, मोरेश्वर मुळे, योगेश दाणी, रामनिवास पारिक, श्रीगोपाल जोशी, नरेंद्र व्यास, घनश्याम पारिक, मयूर जोशी, चंद्रशेखर गटने, अमेय देशमुख आदींनी परिश्रम घेतले. भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी सकाळी होम हवन व पूजा अर्चा झाली. निमगाव वाघ येथील नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला.