वकील संघटनेच्या वतीने ३ टन सफरचंदचे वाटप

0
78

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सोमवारी सकळी नगरमध्ये आल्यावर शहर वकील संघटनेच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो मराठा बांधवाना तब्बल ३ टन सफरचंद व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. उड्डाणपुला खाली नगर महाविद्यालया जवळ वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे, उपाध्यक्ष अ‍ॅड.महेश शेडाळे, सचिव अ‍ॅड.संदीप शेळके यांच्या सह वकिलांनी फळांचे वाटप केले. यावेळी वकील संघटनेचे महिला सहसचिव अ‍ॅड.भक्ती शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड.संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अमोल अकोलकर, अ‍ॅड.सारस क्षेत्रे, अ‍ॅड.विनोद रणसिंग, अ‍ॅड.देवदत्त शहाणे, अ‍ॅड.शिवाजी शिंदे, अ‍ॅड.रामेश्वर कराळे, अ‍ॅड.अस्मिता उदावंत, माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, गौरव दांगट, महेश काळे, अमितेश झिंजुर्डे, विलास चितळे, राजेश कावरे, कृष्णा झावरे, सुरेश भोर, संदीप बुरके, नवाज शेख, वासिम सय्यद, अ‍ॅड.अनुराधा येवले, वैभव पवार, सचिन तरटे, अभिजित कोठारी आदींसह वकील उपस्थित होते.