आज खेळालाही ग्लोबोलायझन प्राप्त झाल्याने खेळातही करिअरच्या अनेक संधी : भुषण मोरे

0
20

भाग्योदय विद्यालयाचा क्रीडा मेळावा

नगर – आजची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतलेली दिसून येते, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. सकस अन्न आणि व्यायाम याचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. विद्याथ्यारनी अभ्यासबरोबरच मैदानी खेळ खेळले पाहिजे. आपल्या शारीरिक क्षमता चांगली राहिल्यास अभ्यासतही मन लागते. प्रत्येकामध्ये काहीतरी क्षमता असते, त्या क्षमतांचा उपयोग करुन एखाद्या खेळात आपण प्राविण्य दाखविले पाहिजे. आज खेळालाही ग्लोबोलाझान प्राप्त झाल्याने खेळातही करिअरच्या अनेक संधी आहेत, त्यामुळे खेळलाही महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन उपायुे भुषण मोरे यांनी केले. केडगाव येथील भा१/२योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद२घाटन अन्न व औषध प्रशासन उपायुे भुषण मोरे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.प्रदीप पवार, संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, जालिंदर कोतकर, पै.खैरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रदीप पवार म्हणाले, मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे, व्यायाम करावा. लहानपणापासून चांगल्या सवयी लावून घ्याव्या, असे आवाहन केले. पै.खैरे यांनी कुस्ती, बॉसिंग, पोहणे असे सर्व खेळात सहभागी झाले पाहिजे.

आज अनेक स्पर्धा होत आहेत, त्यात आपले कौशल्य दाखवून शाळेचे नाव उंचवावे. संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे यांनीही संस्थेच्यावतीने विद्याथ्यारच्या सवारगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये यश मिळवत आहे, याचा संस्थेला अभिमान आहे. यावेळी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, विद्याथ्यारना अभ्यासबरोबरच विविध क्रीडा प्रकारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पधारमध्ये यश मिळवत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. क्रीडा मेळाव्याच्या म ाध्यमातून विद्याथ्यारमधील कला- गुणांना वाव मिळत असल्याने विद्याथ्यारतील क्षमतांचाही विकास होतो. प्रास्तविक गोरख कांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले. शेवटी धनंजय बारगळ यांनी आभार मानले. या मेळाव्याचे नियोजन क्रीडा शिक्षक सोपान तोडमल, एकनाथ होले यांनी केले. क्रीडा मेळावा यशस्वीतेसाठी प्रा.गोविंद कदम, बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, आदिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, रेणुका गुंड आदिंनी परिश्रम घेतले. या क्रीडा मेळाव्यात धावणे, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, खो-खो, मनोरंजनात्मक खेळ, संगीत खुर्ची, पोते स्पर्धा स्लो सायकलिंग, रांगोळी आदि स्पर्धेत विद्याथ्यारनी सहभाग घेतला.