नगर – माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्याथ्यारना एक पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र राज्यातील प्रत्येक शाळांमधील विद्याथ्यारपयरत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. या उपक्रमा अंतर्गत आज शहरातील रेसिडेन्शिअल माध्यामिक विद्यालयामध्ये या पत्राचे जाहिर वाचन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, योजनाचे संचालक महेश पालकर, शिक्षण उपसंचालक पुणे विभाग राजेंद्र आहिरे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, रेसिडेन्शिअलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्याथ्यारचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरो१/२य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती याप्रसंगी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
अभियानात सहभागी होणार्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणार्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरो१/२य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखूमुे, प्लास्टिकमुे शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. सुरुवातीला प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व त्याचबरोबर विद्यालयाच्या वतीने हे अभियान राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. यावेळी सर्व संचालक व उपसंचालकांनी रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन त्याविषयी समाधान व्ये केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचा सर्व प्रशासकीय स्टाफ व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.