आडते बाजार, पिंजारगल्ली कॉर्नर येथील खड२ड्याची तातडीने दुरुस्ती करावी
नगर – शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या आडते बाजार, पिंजार गल्ली कॉर्नर हा बाजारपेठेतील महत्त्वाचा रस्ता आहे. येथे नागरिक अन्नधान्य व इतर खरेदी करण्यासाठी येत असतात. हा एक रहदारीचा भाग असल्याने येथे लोकांची वर्दळ असते. येथे गेल्या चार- पाच दिवसापासून ड्रेनेजचे झाकण तुटून खड्डा झालेला आहे. त्यामुळे येथे येणार्या-जाणार्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. पाऊस झाल्यामुळे त्यात पाणी साचले गेले होते.
त्याचा अंदाज नागरिकांना येत नसल्याने रात्री येथे एक अपघात झाला त्यात एका माणसाचा पाय मोडला तसेच संध्याकाळी एक स्त्री गाडीवरुन जात असताना त्या खड२ड्यामुळे पडून जखमी झाली तरी लवकरात लवकर या बाबीची दखल घेऊन हा खड्डा दुरुस्त करुन पुढील होणारे अपघात टाळावेत. महानगरपालिकेचे प्रशासक व आयुतांनी यावर तातडीने बांधकाम विभागाला आदेश देऊन तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी केले आहे.