नेप्ती उपबाजार समितीमध्ये दीड लाख कांदा गोण्यांची आवक

0
121

सरासरी बाजारभाव १५ ते १६ रुपये प्रतिकिलो, असहकार आंदोलनाचा परिणाम नाही

नगर – कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी ८ जानेवारीपासून असहकार आंदोलन पुकारले असले तरी त्याचा कोणताही परिणाम नगरमध्ये दिसून आलेली नाही. सोमवारी (दि. ८) नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, त्यास सरासरी बाजारभाव १५ ते १६ रुपये प्रतिकिलो निघाला आहे. नगर बाजार समितीत सोमवारी (दि.८) दीड लाख कांदा गोण्यांची म्हणजेच ७५ हजार ि१ंटल आवक झाली. सध्याच्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकर्‍यांनी आपल्याकडील कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे.

यामध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला सर्वाधिक २१०० रुपये प्रतिि१ंटल असा भाव निघाला तर सरासरी बाजारभाव १५०० ते १६०० रुपये प्रतिि१ंटल निघाला. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाचा कोणताही परिणाम कांदा आवकेवर झालेला दिसून आला नाही. दरम्यान मालवाहतूकदारांच्या संपामुळे गुरुवारी (दि. ११) कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.