पतीसह दुचाकीवर चाललेल्या महिलेचे गंठण हिसकावून पळविले

0
76

नगर-पुणे महामार्गावर केडगाव परिसरातील घटना; दोघांवर गुन्हा दाखल

नगर – पतीसह दुचाकीवरून कायनेटिक चौकातून केडगावकडे जाणार्‍या महिलेचे अडीच तोळ्यांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून चोरून नेले. शनिवारी (दि.६) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ब्रेक अँड टेक हॉटेल जवळ ही घटना घडली. या प्रकरणी लता संजय मोहिते (वय ५५, रा. अंकिता कॉप्लेस, सोनेवाडी रोड, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लता या पतीसह बहिणीच्या मुलीकडे कायनेटिक चौकात गेल्या होत्या. तेथून घरी परत जात असताना ब्रेक अँड टेक हॉटेलजवळ एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी मागे बसलेल्या लता यांच्या गळ्यातील मीनी गंठन बळजबरीने हिसकावून तोडून नेले. चोरटे पुण्याच्या दिशेने पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.