रस्ते वाहतूक सुरक्षा ‘रामभरोसे’च; नियमांची सर्रासपणे होतेयं पायमल्ली

0
158

नगर शहरात वाहतूक पोलिसांचे अस्तित्व काही दिसेना; दरवर्षीचा ‘वाहतूक सुरक्षा सप्ताह’ राबवला जातोयं कागदावरच

नगर – वाहनचालकांना वाहतुक शिस्त लागावी, त्यातून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जानेवारी महिन्यात वाहतूक सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. यामध्ये नागरिकांच्या प्रबोधनासाठी पोस्टर्स, पुस्तिका तयार केल्या जातात. प्रत्यक्षात त्यातील उपदेश कागदावरच राहून रस्त्यावर मात्र, बेशिस्त वाहतूक सुरू असल्याचे आढळून येते. ट ्रक, टॅम्पोमध्ये बसून ल३/४ाला निघालेली वर्‍हाडी मंडळी… टि ्रपल सीट बसून सुसाट जाणारे बाइकर्स… राँगसाइडने चालणारे वाहनचालक… असे धोकादायक वाहतुकीचे चित्र नगर शहरामध्ये सध्या दिसत आहे. जानेवारी महिन्यात पंधरा दिवस वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरक्षा पंधरवाडा राबवला जातो. याशिवाय सध्या पोलिसांच्या स्थापना दिनाचेही विविध उपक्रम सुरू होत आहेत. त्यातही वाहतुकीसंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. या कालावधील वाहतूक पोलिस कॉलेज विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने विविध जनजागृतीचे उपक्रम राबवतात. परंतु अद्यापपयरत शहरामधील धोकादायक वाहतूक रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

शहरातील माळीवाडा बसस्थानक चौक, मार्केटयार्ड, स क्कर चौक, चांदणी चौक, एसबीआय चौक, डीएसपी चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, दिल्लीगेट या परिसरात तर पोलिसांसमोर सर्रास धोकादायक वाहतूक सुरु असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर टि ्रपल सीट जाणारे नागरिक पोलिस दिसल्यानंतर गाडी थांबवतात. त्यानंतर गाडीवर बसलेला एक जण उतरतो. पोलिस असलेल्या ठिकाणावरुन थोडे पुढे गेल्यानंतर पून्हा गाडीवर टि ्रपल सीट बसून नागरिक निघून जातात. अनेकवेळा हा प्रकार पोलिसांनी पाहिला असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याशिवाय पोलिसांसमोरुन वर्‍हाड घेऊन जाणारे वाहने जातात. मात्र, त्याकडेही फारसे लक्ष दिले जात नाही. निदान वाहतूक सुरक्षा पंधरवाडा सुरु झाल्यानंतर तरी नगर मधील बेशिस्त व धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी पोलिस कडक भूमिका घेतील का ? बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी सुरु करण्यात येणार्‍या कारवाईमध्ये सातत्य ठेवतील का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बेशिस्त वाहतुकीचे कोणालाही वाटेना गांभीर्य

नगर शहरांमध्ये वाहन चालक सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली करताना पाहायला मिळतात. या वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक पोलिसांवर आहे. मात्र सध्या शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे. कारण शहरातील डीएसपी चौक सोडला तर इतर कोणत्याच चौकात शहर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. विशेष म्हणजे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक यांना नगर शहराच्या वाहतुकीबाबत कोणतेच गांभीर्य नाही असे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनाही शिस्त लागत नाही त्यांच्या मनात असा ग्रह निर्माण झाला आहे की वाहने कशीही चालवली तरी आपल्याला कोण पकडणार ? आणि आपल्यावर कोण कारवाई करणार? त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व नियमांची पायमल्ली करणार्‍या वाहन चालकांमुळे नियम पाळणार्‍या वाहन चालकाला त्रास सहन करावा लागतो.