पुन्हा ‘ती’ चूक न करता पक्षिय मतभेद बाजूला ठेवण्यास माझी तयारी

0
108

दादाभाऊ कळमकरांचे सूचक वतव्य, शहर भाजपच्या वतीने अभिष्टचिंतन

शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी भाजपचे भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, माजी महापौर अभिषेक कळमकर, आसाराम कावरे, बाळासाहेब खताडे, मयूर बोचुघोळ, मुकुल गंधे, सुहास पाथरकर, अशोक गायकवाड, स्वप्नील बेद्रे, सोमनाथ चिंतामणी आदी.

नगर – १९७२ पासून शहरात राजकारण करतना कुठेही कटुता येणार नाही याची काळजी घेतली. सर्वाना बरोबर घेत सर्व पक्षांशी चांगले संबध जपले. राजकारणापेक्षा मैत्री जपली. मात्र काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक व पाप मी केले आहे. त्यामुळे आपले नगर शहर बदनाम व मागे गेले आहे. शहरात व्यापार व औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत आहे, अशी खंत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वसंत लोढा म्हणाले ते खरं आहे. आता पुन्हा ती चूक करणार नाही. ही चूक सुधारण्याची संधी आलेली आहे. शहरात निर्माण झालेली बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्व एक होवू. वर काहीही निर्णय होवो मात्र शहरात पक्षिय मतभेद बाजूला ठेवण्यास माझी तयारी आहे. शहराचा आमदार व महापालिकेचे सत्ताधारी एकाच विचाराचे असावेत तरच शहराचा विकास होईल, अशी सूचनाही दादा कळमकर यांनी केली. शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी दादाभाऊ कळमकरांनी खंत व्यक्त करत पुढील काळात नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले. यावेळी भाजपचे माजी जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दादा कळमकर पुढे म्हणाले, मी व अनिल राठोड ५ वेळा विधानसभा विरोधात लढलो. पण निवडणुका संपल्यावर मतभेत विसरून कायम एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत. नगरपालिकेच्या माध्यमातूनही शहराच्या विकासासठी अनेकदा भाजपला बरोबर घेतले. पुलोद मधून आमदारकी लढताना भाजपने मोठी साथ दिली म्हणूनच निवडून आलो. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्कारामुळे आनंद झाला आहे. वसंत लोढा म्हणाले, दादा कळमकर पुलोद मधून विधानसभा लढताना सर्वांनी एकमताने त्यांना पाठींबा दिला होता. लता लोढांही शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्यासाठी दादांनी मदत केली. मात्र शहरात ज्यांचे राजकारण संपल्यात जमा होते अशांना दादांनी मदत करून आमदार केल्याने शहराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचे दूरगामी फळ नगरकर भोगत आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराच्या भवितव्यासाठी दादांनी योग्य मार्गदर्शन करावे. अभय आगरकर म्हणाले, दादाभाऊ हे अजात शत्रू आहेत. तत्ववादी व भावनात्मक राजकारण त्यांनी आयुष्यभर केले. आपले पक्ष जरी विरोधातील असले एका विचाराने आपण काम करणारे आहोत. भानुदास बेरड म्हणाले, नगरच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून दादाभाऊंकडे पहिले जात आहे. भाजपच्या जुन्या पदाधिकार्‍यांशी त्यांचा ऋणानुबंध आहे. आगामी काळात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी. सचिन पारखी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस प्रशांत मुथा, महेश नामदे, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक आसाराम कावरे, बाळासाहेब खताडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर बोचुघोळ, मुकुल गंधे, सुहास पाथरकर, अशोक गायकवाड, स्वप्नील बेद्रे, सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते.