नगर जिल्ह्यातील पृथाशक्ती एफपीसीचे महिला सबलीकरणाचे कार्य कौतुकास्पद

0
83

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

नगर जिल्ह्यातील पृथाशती एफ.पी.सी.चे महिला सबलीकरणासाठी नाफेड व एन.सी.सी.एफ.द्वारे तूर उत्पादित शेतकर्‍यांतर्फे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचा सत्कार करताना डॉ. भाग्यश्री टिळेकर व महिला सभासद

नगर – नाफेड व एनसीसीएफद्वारे तूर उत्पादक शेतकर्‍यांसाठी ई- समृद्धी पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. तसेच तूर दाळ उत्पादनामध्ये आपल्या देशास आत्मनिर्भर बनविण्यासाठी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी त्यांचा पृथाशक्ती एफपीसीच्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री टिळेकर व महिला सभासद यांनी सत्कार केला. यावेळी मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पृथाशक्ती एफपीसीचे सुरु असलेले महिला सबलीकरणाचे कार्य कौतुकास्पद आहे, याचबरोबर शेती क्षेत्रात महिलांना एकत्रित करून शेतकर्‍यांकडून शेती उत्पादने खरेदी करत शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे, तसेच शेती क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलाची माहिती महिलांच्या मार्फत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. मंत्री अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, आज आम्ही तूर उत्पादक शेतकर्‍यांसाठी ई- समृद्धी या पोर्टलच्या माध्यमातून असा एक उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना आगाऊ नोंदणी करून त्यांची तूरडाळ नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून विकण्याची सोय उपलब्ध होईल आणि त्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून हमीभावाने किंवा हमीभावापेक्षा जास्त असलेल्या बाजारातील दराने त्यांच्या मालाच्या विक्रीचे शुल्क प्राप्त करता येईल, येणार्‍या दिवसांमध्ये शेतकर्‍यांची समृद्धी, डाळींच्या उत्पादनातील देशाची स्वयंपूर्णता आणि पोषण मोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा हा प्रारंभ आगामी काळात देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठे बदल घडवून आणण्याची सुरुवात आहे, डाळींचे पीक दाखल झाल्यानंतर जर डाळींच्या किमती हमीभावापेक्षा जास्त असतील तर त्याच्या सरासरीची गणना करून शेतकर्‍यांकडून जास्त दराने डाळी खरेदी करण्यासाठी एक शास्त्रीय सूत्र तयार करण्यात आले आहे आणि यामुळे शेतकर्‍यांवर कधीही अन्याय होणार नाही, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि बिहार यांसारख्या राज्यांमधील शेतकर्‍यांसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे की त्यांना डाळींसाठी त्यांच्या जमिनीच्या आकारमानाची नोंदणी करता येईल. त्यांच्या डाळीची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन त्यांना देता येऊ शकेल असे त्यांनी सांगितले. तसेच अल्पावधीत पोर्टल सुरू केल्याबद्दल नाफेड आणि एनसीसीएफची मंत्री अमित शाह यांनी प्रशंसा करत येत्या काही दिवसांत नाफेड आणि एनसीसीएफ याच धर्तीवर मयाची नोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे शेतकरी मका पेरतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा मका हमीभावावर थेट इथेनॉल निर्मिती कारखान्यात विकण्याची व्यवस्था करू, जेणेकरून शेतकर्‍याची पिळवणूक होणार नाही, आणि पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे अमित शहा यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या शेताची केवळ मका उत्पदनाचेच क्षेत्र म्हणून ओळख न राहता ते पेट्रोल उत्पादनाची विहीर
बनणार आहे, असे त्यांनी सांगितले.