गंजबाजार लगत सराफ बाजारमधील रस्त्यावरचे ड्रेनेज लाईनचे काम होऊन पंधरा दिवस झाले. मात्र खोदाईमुळे रस्त्यावर प्रचंड खाचखळगे पडलेले असून, रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ड्रेनेज लाईनचे काम करणार्या ठेकेदारांने रस्त्याची लेवलही केली नाही, त्यामुळे खाच-खळगे आणि खड्डे असलेल्या या रस्त्यावर वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.