अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे संचालकाच्या दुकानासमोर रास्ता रोको आंदोलन

0
82

नगर – नगर अर्बन बँकेत अडकून पडल्याने ठेवीदारांना विविध संकटाचा सामना करावा लागत असून अनेक ठेवीदारांच्या घरात लग्न, औषधोपचार, शिक्षण, आजारपण अशी अनेक संकटे आहेत. बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून बँकेला बुडविणार्‍या संचालकांच्या विरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तसेच बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदारांनी व बँक बचाव समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि.३) शहरातील स्वस्तिक चौकाजवळ एका माजी संचालकाच्या दुकानासमोर नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. बँकेच्या ठेवीदारांनी आर्थिक अडचण आली तर वेळेला उपयोगी पडतील म्हणून या ठेवी ठेवीदारांनी बँकेत ठेवलेल्या होत्या मात्र नगर अर्बन बँकेच्या काही जणांनी संगनमत करून घोटाळा केला आणि आर्थिक अडचणीत आणून बँक रिझर्व बँकेच्या दारात नेऊन सोडली.

निदर्शने करत दोषी संचालकांवर तातडीने अटकेची कारवाई करण्याची मागणी

रिझर्व बँकेने अखेर बँकेचा परवाना रद्द केला आणि ठेवीदार आगीतून फुफाट्यात येऊन आणखीन अडकले. ठेवीदारांच्या स्वप्नांचा अक्षरश… संगनमताने चुराडा करण्यात आलेला असून हतबल झालेल्या ठेवीदारांना पोलीस प्रशासन तसेच शासकीय व्यवस्थादेखील म्हणावी अशी मदत करत नसल्याचे चित्र आहे. हतबल झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अक्षरश: स्वत…वर आसूड मारून घेत आंदोलन केले मात्र तरी देखील या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची हिम्मत जिल्हा पोलीस प्रशासनाने दाखवली नाही तर दुसरीकडे इतर शासकीय यंत्रणा देखील ठेवीदारांच्या प्रश्नावर ‘अदृश्य शेी’च्या दहशतीमुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अनेक ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.

नगर अर्बन बँक बचाव समिती ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात म्हणून प्रशासकाकडे वारंवार संपर्क साधत आहे आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची देखील भेट अनेकदा समितीने भेट घेतलेली आहे. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावरच कुठलीतरी अदृश्य शेी दबाव टाकत आहे असा देखील आरोप आता केला जात आहे. शासकीय यंत्रणा आणि अधिकारी अदृश्य शेीचे गुलाम झालेले दिसून येत आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) ठेवीदारांनी व बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांनी रास्ता रोको करत निदर्शने केली.