भूषणनगर परिसरातील नागरिकांशी ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर सुसंवाद कार्यक्रमात व्याख्याते : गणेश शिंदे
नगर – कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता ओतप्रोत प्रेम करणारी स्त्री जर कोण असेल, तर ती म्हणजे आपली आई आहे. आपले वय झाले तरी, आईसाठी आपले बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपते, जेव्हा आई या जगाचा निरोप घेते. आई गेली की समजायचे आपले बालपण संपले. आई आहे तोपयरत सर्व हट्ट आईकडे आपण करतो, असे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. नूतन वर्षाचे औचित्य साधून संदीप कोतकर मित्रमंडळ व युवा मंचाच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संकल्पनेतून ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर केडगाव, भूषणनगर येथे व्याख्याते गणेश शिंदे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेविका सविता कराळे, शकुंतला पवार, अशोक कराळे, जालिंदर कोतकर, गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, भूषण गुंड, शुभम कोतकर, गणेश सातपुते, सागर सातपुते, नीलेश सातपुते, तांदळेमहाराज पाटील, भाऊसाहेब विधाते, राजेंद्र भंडारी, आनंद पतंगे, डॉ. किर्तने, मुथा, सोनी, अशोक लाटे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, जोपयरत माणसे जिवंत आहेत, तोपयरत प्रेम द्या. ज्या माणसासोबत आपण आहोत, त्यांना प्रेम द्या. दुसर्या गावात शहरात, प्रदेशात गेलेली माणसं परत भेटतील. परंतु वर गेलेला माणूस परत भेटणार नाही. आई, वडील, बहिण, भाऊ यांना जपा. नात्यांना जपा. आई- वडिलांची सेवा करा. एकत्र कुटुंब पद्धतीत जुन्या पिढीने मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. परंतु सध्याच्या कलियुगात विभे कुटुंब पद्धतीमुळे लहान वयातील मुलांचे रूम स्वतंत्र आहेत. त्यामुळे प्रेम दुरावत असल्याची खंत त्यांनी व्ये केली. यावेळी अशोक कराळे म्हणाले की, नूतन वर्षाचे औचित्य साधून नागरिकांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास भूषणनगर व केडगाव परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या. युवा मंचाच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच दिवाळी पाडवा पहाटनिमित्त केडगाव देवी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासही नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे ते म्हणाले. आभार भूषण गुंड यांनी मानले.