चाँदबिबी महाल येथे कुत्र्याच्या हल्ल्यातून कोकिळा पक्षी बचावले

0
96

नगर – शहराच्या काही अंतरावर असणार्‍या चाँदबिबी महाल येथे कोकिळा पक्षी पाणी व खाद्याच्या शोधामध्ये आला असता कुत्र्यांनी हल्ला केला व जखमी अवस्थेत कोकिळा पक्षीला सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांनी धाव घेऊन प्राण वाचून वन अधिकारी शरमाळे व अर्जुन खेडकर यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील, ऋषी खामकर, अंकित चव्हाण, ओम जंगम आदी उपस्थित होते.

कोकिळा पक्षी वर उपचार केल्यानंतर निसर्गात मुेता केली जाणार आहे. तसेच पक्षी प्राणी व अन्य जीव हे पाणी व खाद्याच्या शोधामध्ये कोठेही आढळून येणार असून दिसल्यास त्यांना मारू नये व त्यासाठी मो. न. ९३७००७५५५५ / ९६६५०७५५५५ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा बेरड पाटील यांनी केले आहे.