छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मनपा प्रशासनाने निगा राखावी

0
161

शिवराष्ट्र सेनेचे आयुतांना निवेदनमनपाच्या मुख्य इमारती समोर नव्याने स्थापिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निगा राखावी, अशा आशयाचे निवेदन शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने अध्यक्ष संतोष नवसुपे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर व देवदत्त पुजारी यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिल

गेली दहा ते पंधरा दिवस झाले मनपाच्या मुख्य इमारती समोर नव्याने स्थापिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निगा राखावी, अशा आशयाचे निवेदन शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने अध्यक्ष संतोष नवसुपे, अनिल शेकटकर व देवदत्त पुजारी यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, नव्याने मनपा आवारामध्ये सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे थाटात उद्घाटन होऊन दहा ते पंधरा दिवस झालेले असून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून पुतळ्याची पुजाय्अर्चा तसेच पुष्पहार वाहण्यात आलेले नाही. या पुतळ्याची पंधरा दिवसांपासून कुठलीही देखभाल झालेली दिसून येत नाही. शिव राष्ट्र सेनेकडुन प्रशासनाला विचारण्यात येते की, प्रशासन लाखो रूपयांची उधळण नको त्या गोष्टींवर करते व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यावर व त्यांच्या पुजेवर एक रूपया खर्च करू शकत नाही. प्रशासनाला शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने सांगण्यात येते की जर दैनंदिन पुष्प व आहाराचा खर्च प्रशासन करणार नसेल तर शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने दैनंदिन व नित्य पूजा या ठिकाणी करण्यात येईल व संपूर्ण खर्च शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने करण्यात येईल, अशी यावेळी निवेदन रुपी विनंती करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी सविस्तर निवेदन ऐकले व आम्ही याची सर्व व्यवस्था करू असे आश्वासन देऊन आपल्या वतीने कवड्याच्या माळीची व्यवस्था करावी असे सुचित केले.