0
140

विश्वहिंदू परिषद व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिर विश्वस्तांचे संम्मेलनात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवंम अर्चक पुरोहित आयामाचे क्षेत्राचे प्रमुख अनिल सांबरे. समवेत मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

नगर – हिंदू समाजाच्या कल्याणासाठी मंदिरांची निर्मिती झाली आहे. हिंदू समाजाच्या कल्याणाची भूमिका मंदिराने निभावली पाहिजे. मंदिर हे सर्वांचे आदर्श आहेत. जे जे समाजाला चांगले द्यायचे आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंदिर असले पाहिजे. मंदिर म्हणजे निवृत्तीनंतरचा विषय आहे. असे न समजता जो तरुण मंदिराची अस्मिता जपतो. त्या तरुणांना मंदिरात जोडले पाहिजेत. ज्या भागात हिंदू समाज संपला त्या भागात मंदिरांची दुरावस्था झाली आहे. मंदिराचे प्रश्न सोडवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची धडपड सुरू आहे. पूर्वी प्रत्येक मंदिरांचे आखाडे होते. नागपुरात श्रीराम मंदिरांच्या व्यायाम शाळेत दीडशे तरुण व्यायामासाठी येत असतात. मंदिरांनी गोशाळा, व्यायाम शाळा सुरू करावी. तसेच शैक्षणिक उपक्रम घ्यावेत. तसेच मंदिरे धार्मिक नेतृत्व करीत असतात. म्हणून घर वापसी करणार्‍यांचे स्वागत करण्यासाठी मंदिरानी पुढाकार घ्यावा. मंदिराच्या विश्वस्तांनी जेवढा वेळ मंदिरासाठी देत आहेत. त्यातील दहा टक्के वेळ मंदिर संघटनेच्या कार्यास दिल्यास मंदिराचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवंम अर्चक पुरोहित आयामाचे क्षेत्राचे प्रमुख अनिल सांबरे यांनी केले आहे. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात विश्वहिंदू परिषद व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिर विश्वस्तांचे संम्मेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. या मंदिर संमेलनात २३२ विश्वस्त संस्था व ४५० मंदिरांच्या विश्वस्तांनी सहभाग नोंदविला. हिंदूबोध मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अ‍ॅड.नरेश गुगळे यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत महंत सुनीलगिरी महाराज, समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी, धर्मगुरू राजाभाऊ कोठारी, हभप नवनाथ महाराज शास्त्री, हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर, हभप हनुमंत महाराज शास्त्री, साळसिद बुवा संस्थान, विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवंम अर्चक पुरोहित आयामाचे क्षेत्र प्रमुख अनिल सांबरे, प्रांतमंत्री प्रा.संजय मुद्राळे, प्रांत सहमंत्री अ‍ॅड.सतिश गोरडे व देशपांडे संस्थेचे प्रमुख अ‍ॅड.जयदीप देशपांडे,जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, अमोल भांबरकर, हेमंत हरहरे, दादा ढवाण, मनोहर ओक, जयप्रकाश खोत, धनाजी शिंदे, प्रांत प्रचार प्रमुख तुषार कुलक्रणी, अनिरुद्ध पंडीत संघटन मंत्री,सतिश आरगडे, विभागमंत्री सुनिल ख्रिस्ती, नाना भोरे,राजेंद्र चोपडा, वसंत लोढा, दत्ता जगताप, अभय आगरकर, प्रमोद मूळे, माणिकराव देशपांडे, अशोक महाराज जोशी, श्रीराम हजारे, अनिल निकम आदी उपस्थित होते. महंत सुनील गिरी महाराज म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र हे राष्ट्रीय दैवत आहेत.साडेपाचशे वर्षानंतर अनेकांनी दिलेल्या बलिदानानंतर २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होत आहे. प्रत्येकाला अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी जावे असे वाटते. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी गावागावात, मठ मंदिरात, घरोघरी दसरा व दिवाळी साजरी करावी. मंदिरात गुढी उभारावी, दिपोत्सव करावा. मंदिराचे अनेक प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. प्रत्येकाने धर्मकार्यात सहभागी होऊन राष्ट्रहित व धर्महित ही जपावे, असे सांगितले. मंदिर विश्वस्त संम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी, मठमंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरीभाऊ डोळसे, शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर, कौस्तुभ कुलकर्णी, पल्लवी कांबळे, सीताराम दाणी, शिवम रोटे, सत्यम नामदे, वैभव पाटील, दीपाली बढे, समीर पाठक, यश नाईक, अवधूत तुंगार, रोहित बुधवंत, मनोहर भाकरे, बाली जोशी, ओम पांडे, भारत थोरात, साहिल पवार, शिवराज पवार, जयंत वारनौक आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जयप्रकाश खोत यांनी केले. ठरावाचे वाचन जयेश बडवे, दीपक शहाणे, रामनाथ दातीर, नामदेव परांडे, अमोल कोहोक यांनी केले. मंदिर विश्वस्तांना हिंदूबोध चा विशेषांक व विश्वहिंदू परिषदेची दिनदर्शिका मोफत देण्यात आली. सूत्रसंचालन सुनील खिस्ती यांनी केले. तर आभार अँड.जयदीप देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.