अन्यथा शहरात तीव्र आंदोलन करणार चायना मांजाच्या विक्रीवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देताना अजिंय बोरकर, सचिन जगताप, हर्षल बांगर, सचिन दारकुंडे, राहुल शहाणे, बंटी बारस्कर आदी.
बंदी असलेला नायलॉन चायना मांजा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या निषेधार्थ मांजा विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई करण्याची मागणी मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अजिंय बोरकर, सचिन जगताप, हर्षल बांगर, सचिन दारकुंडे, राहुल शहाणे, बंटी बारस्कर आदी उपस्थित होते. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेला चायना नायलॉन मांजाची विक्री सुरू असून या मांज्यामुळे याआधीही अनेक वेळा नागरिकांचे जीव धोयात आलेले आहेत. तर काही नागरिक मृत्युमुखी देखील पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्याचा मृत्यू अशाच नायलॉन मांजामुळे गळा कापून झाल्याची घटना ताजी असून त्यानंतर नगर शहरातील जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी या नायलॉन मांजामुळे जखमी होऊन त्याला १५ टाके पडल्याची घटना ताजी आहे. अहमदनगर शहरात दरवर्षी मनुष्यांसह प्राणी आणि पशुपक्षी यांना या नायलॉन मांजामुळे दुखापत होत असते अनेक लहान मुलेही या नायलॉन मांजाला बळी पडले आहेत. त्यामुळे या नायलॉन मांजाची विक्री थांबून विक्रेत्यांवर छापे टाकावेत व हा मनुष्य आणि पशु पक्षांना घातक असलेला मांजा नष्ट करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.