छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मिरावली पहाडाकडे जाणार्या वारूळवाडी कमान शेजारी हायवे च्या कडेला कचर्या च्या राशी झाल्या असून या महामार्गावरून जाणार्या येणार्या नागरिकांना दुर्गंधी चा सामना करावा लागत आहे तसेच कचरा जाळला जात असल्यामुळे प्रदूषण ची समस्या ही निर्माण होत आहे. या महामार्गावर अहमदनगर महापालिका वॉर्ड क्र.२ राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट तसेच नगर तालुयातील वारूळवाडी,पोखर्डी, बुर्हाणनगरची (पंचायत समिती नगर) हद्द येते तसेच या मार्गावर रस्त्याच्या कडेला मटणवेस्ट च्या कचर्याच्या गोण्या ही टाकल्या जात आहेत तरी या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी वरील सर्व विभागाची संयुक्त बैठक बोलवून या संदर्भात कडक उपाय योजना करून या कचरा टाकणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत