नगर – नगर-पुणे महामार्गावरील भीमा कोरेगाव (मौजे पेरणे ता. हवेली, जि. पुणे) येथील शौर्य स्तंभाला अभिवादनासाठी १ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याकडे जाणारी व नगरकडून सरळ पुण्याकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. सदरचा आदेश ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ ते २ जानेवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असणार आहे. नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुण्याकडे जाणार्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा- देवदैठण- पिंपरी कोळंदरय्उक्कडगाव- बेलवंडी- नगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ- मढे वडगाव- काष्टी- दौंड- सोलापुर-पुणे महामार्गा मार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे. नगरकडून सरळ पुण्याकडे जाणार्या वाहतुकीकरीता कायनेटीक चौक- केडगाव बायपास- अरणगाव बायपास- कोळगाव- लोणी व्यंकनाथ- मढे वडगाव- काष्टीय्दौंड- सोलापूर पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे. तसेच नगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी कल्याण बायपास- आळेफाटा- ओतुर- माळशेज घाट असा मार्ग असणार आहे. दरम्यान प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, शौर्य स्तंभाला अभिवादनासाठी जाणार्या नागरिकांची वाहने, रूग्णवाहिका, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.असे या आदेशात म्हंटले आहे. पुणे जिल्हाधिकार्यांकडूनही वाहतुकीचे नियमन कोरेगाव-भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जात आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीचे ३० डिसेंबरला सायंकाळी ५ ते १ जानेवारीला रात्री १२ पर्यंत नियमन करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकार्यांनी हे वाहतुकीचे नियमन केले आहे. शिक्रापूर ते चाकण या टप्प्यामध्ये सर्व वाहनांना वाहतूक बंद राहणार आहे. अहमदनगरकडून पुण्याला जाणार्या वाहनांना शिरूर – न्हावरा फाटा, केडगाव चौफुला, सोलापूर महामार्गाने हडपसर मार्गाने पुणे या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. पुण्यावरून अहमदनगरकडे येणार्या वाहनांही या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. मुंबईकडून अहमदनगरकडे येणार्या वाहनांना वडगाव मावळ, तळेगाव, चाकण, खेड, नारायणगाव, आळेफाटा मार्गाने अहमदनगर असा प्रवास करावा लागणार आहे. कार आणि जीप अशा लहान आणि हलया वाहनांना खेड-पाबळ-शिरूर या मार्गाचा अवलंब करावा लागणार असल्याचे या आदेशात म्हंटले आहे