दुष्काळ जाहीर करण्यासाठी चांदणी चौकात रास्ता रोको

0
133

नगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव तालुयात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना कराव्यात तसेच शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पाथर्डी तालुयातील कुत्तरवाडी येथील तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी नगरच्या चांदणी चौकात गुरुवारी (दि.२८) दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भिंगार कॅम्पचे स.पो.नि. दिनकर मुंडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले व समज देवून सोडून दिले.