नगर शहर व भिंगार येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण

0
139

तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल

नगर – शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस त्या मुलींचा शोध घेत आहे. मुळची संगमनेर तालुयातील एका गावातील अल्पवयीन मुलगी (वय १७) नगरमधील गुलमोहोर रस्त्यावर भाडोत्री रूमवर राहत होती. ती शिक्षणासाठी येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान रविवारी (दि.२४) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर शहर गाठले. मुलीचा शोध घेतला परंतू ती मिळून न आल्याने त्यांनी सोमवारी (दि.२५) दुपारी तोफखाना पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स.पो.नि. जे.सी.मुजावर करीत आहेत. मुलीच्या अपहरणाची दुसरी घटना भिंगारमध्ये घडली. मुळचे मेहेकर (जि. बुलढाणा) तालुयातील एका गावातील रहिवाशी असलेले कुटुंब सध्या भिंगार शहरात राहत आहे. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला (वय १४) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सदरची घटना सोमवारी (दि.२५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मुलगी घरात नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.