लष्करी जवानाचे घर फोडून रोकड व दागिन्यांची चोरी

0
87

नगर – जामखेड रोडवर लष्करी वसाहतीत असलेल्या लष्करी जवानाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२६) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लष्करात नायक पदावर कार्यरत असलेले अमित प्रेमचंद जयस्वाल (रा. क्वार्टर नं. पी. ३७/१, नगर – जामखेड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे लष्करी वसाहतीत असलेले बंद घर अज्ञात चोरट्यांनी दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ या कालावधीत फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही चोरीची घटना निदर्शनास आल्यावर जयस्वाल यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२६) दुपारी जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७, ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.