शहर परिसरात धुयाची चादर आणि थंडीची चाहूल…

0
33

नगर शहर आणि परिसरासह ग्रामीण भागातही ७ डिसेंबर रोजी पहाटेपासून सर्वत्र धुयाची चादर पसरली होती. या धुयात रस्ते हरवून गेले होते. त्यामुळे पहाटेच्यावेळी वाहनचालकांना वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत होता. या धुयामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यास मिळाले.

सकाळी ९ वाजेनंतर धुके कमी झाले, परंतु ढगाळ वातावरणामुळे थंडीतही वाढ झाली असून, थंडीची चाहूल लागल्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही आणि गुरुवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटले होते. सकाळी सूर्य उगवला तरी वाहनेदिवे लावून रस्ता पार करत होत.