प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील हमाल, मापाडी कामगारांतर्फे १४ डिसेंबर रोजी ‘बंद’ ठेवून ‘निदर्शने’

0
33

जल्ह्यातील सर्व हमाल, मापाडी यांनी संपात सहभागी व्हावे : अविनाश घुले

नगर – माथाडी कायद्याची राज्यभर कठोर व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि माथाडी कायदा सुधारणेच्या नावाने आणलेले माथाडी व असंरक्षित सुरक्षा रक्षक अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक-३४ हे माथाडी कामगार विरोधी असल्याने ते तात्काळ मागे घेणे व माथाडी कायद्याची जाणिवपुर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी यासह कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १४ डिसेंबर रोजी राज्यभरातील सर्व हमाल, मापाडी कामगारांच्यावतीने बंद ठेवून निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली. १४ डिसेंबर रोजी संप, निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

माथाडी कायदा वाचविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विभागातील हमाली, मापाईचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. कष्टकरी कामगारांसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था, संघटना यांनीही या कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्र येत या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन अविनाश घुले यांनी केले आहे