‘आचार्य आनंदऋषीजी मार्ग स्वस्तिक स्तंभा’च्या माध्यमातून शुभकार्याची प्रेरणा ऊर्जा मिळत राहील

0
60

स्वस्तिक चौक येथे आचार्य आनंदऋषीजी मार्ग स्तंभाचे लोकार्पण-आमदार संग्राम जगताप

स्वस्तिक चौक येथे आचार्य आनंदऋषीजी मार्ग येथील स्वस्तिक स्तंभाचे लोकार्पण करताना आ. संग्राम जगताप. समवेत उपमहापौर गणेश भोसले, उपसभापती मिनाताई चोपडा, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, गौतमलाल बरमेचा,      अमित बरमेचा, शारदाबाई बरमेचा, नरेंद्र बाफना, मोहनलाल बरमेचा.

नगर – आपले शहर पूर्वी दोन वेशीच्या आत ले शहर होते आता मात्र चारही बाजूने विकास कामांच्या माध्यमातून उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाच्या कामाला गती दिली आहे सर्वांच्या सहकार्यातून शहराचे वैभव उभे राहत आहे. आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून जैन बांधव मोठ्या संख्येने येत असतात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या परिसरामध्ये दर्जे दार काँक्रीटचे रस्ते निर्माण केले आहे यातच बरमेचा कुटुंबियांच्या वतीने स्व. सुभाषचंद्र बरमेचा यांच्या स्मरणार्थ स्वस्तिक चौक येथे आचार्य आनंदऋषीजी मार्ग स्तंभाची उभारणी केली आहे. याचबरोबर बुरूडगाव रोडवर अहिंसा चौक येथे गाय वासरू शिल्पाची उभारणी करून धर्म संस्कृतीचे प्रतीक निर्माण केले आहे नगरकर पुढाकार घेत शहर विकासाला मदत करत आहे नगरकरांना अभिमान वाटेल असे काम सुरू असून ठीकठिकाणी चांगले चौक निर्माण होण्याकरता आमचे काम सुरू आहे. विकास कामांच्या योजना बरोबरच शहर सुशोभिकरणाचे रूप प्राप्त करून

आपले शहर महानगराकडे घेऊन जायचे आहे विकास कामांच्या माध्यमातून गतिमान शहर निर्माण करायचे आहे. नियोजनबद्ध दर्जेदार कायमस्वरूपीच्या कामामुळे विकासाची कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. स्वस्तिक स्तंभाच्या माध्यमातून शुभकार्याची चांगली प्रेरणा ऊर्जा मिळत राहील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले स्वस्तिक चौक येथे आचार्य आनंदऋषीजी मार्ग स्तंभाचे लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, गौतमलाल बरमेचा, अमित बरमेचा, शारदाबाई बरमेचा, नरेंद्र बाफना, मोहन बरमेचा, शांतीलाल गांधी, मनेष साठे, अनिल पोखरणा, अण्णासेठ मुनोत, मेहुल भंडारी, डॉ. विजय भंडारी, वैभव वाघ आदी उपस्थित होते उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, शहर विकासाची चांगले कामे निर्माण होत असून यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच शहराच्या सर्वच भागांमध्ये विकासाची कामे सुरू आहेत. पुढील एक वर्षांमध्ये आपले शहर नक्कीच बदललेले दिसणार आहे. चौक सुशोभीकरण करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगरकर पुढे येत असून लवकरच चाणय चौकात देखील सीएअसोसिएशनच्या माध्यमातून आकर्षक शिल्प उभे राहणार आहेत, असे ते म्हणाले.

गौतमलाल बरमेचा म्हणाले की, स्वस्तिक चौक येथे स्वस्तिक उद्योग समूहाच्या वतीने स्तंभ उभा करण्याचा संकल्प होता. आ. संग्राम जगताप यांनी या कामासाठी आम्हाला मदत करत आमचे स्वप्न पूर्ण केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. स्तंभाच्या माध्यमातून समाजाला शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील, असे ते म्हणाले. अमित बरमेचा म्हणाले की, नगर शहराचा स्वस्तिक उद्योग समूहाच्या योगदानामध्ये मोठा वाटा आहे. आपल्या शहरासाठी काहीतरी करावे या कर्तव्याच्या माध्यमातून स्वस्तिक स्तंभ उभ केला आहे. या माध्यमातून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केले तर आभार प्रदर्शन सीए मोहन बरमेचा यांनी मांडले. सूत्रसंचालन जोशी यांनी केले. स्वस्तिक म्हटले की आपल्या कुठल्याही शुभकार्याची सुरुवात यापासून होत असते प्रत्येकाने सकारात्मक ऊर्जा अंगीकारून चांगले काम उभे करावे जेणेकरून आपल्या शहराच्या योगदानामध्ये मदत होईल. मी शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी नगरकरांचा सेवक म्हणून काम करत आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गाचे पहिल्या टप्प्यातील काँक्रीटीकरण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळीवाडा वेशीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.