महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून पळविले

0
40

बालिकाश्रम रस्त्यावरील घटना; २ अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

 

नगर – विडी कामगार महिलेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोघांनी ओरबाडले. शुक्रवारी (दि. १) सकाळी साडे दहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील जय शंकर मेन्स वेअरच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७ रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घरीच बिड्या बनविण्याचे काम करतात. त्यांनी बनविलेल्या बिड्या नवरंग व्यायामशाळा, तोफखाना येथे असलेल्या कंपनीमध्ये पोहच करण्यासाठी त्या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या.

बिड्या कंपनीत पोहच केल्यानंतर त्या बालिकाश्रम रस्त्यावरून घरी जात असताना जय शंकर मेन्स वेअरच्या समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडले. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचे साडे तीन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दागिने चोरणार्‍या चोरट्यांनी फिर्यादीला जोराचा ध क्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर चोरटे साताळकर हॉस्पिटलच्या दिशेने पसार झाले.

फिर्यादीने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यातील एका तरुणाने चोरट्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला असता ते तोपयरत पसार झाले घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून बालिकाश्रम रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.