श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी

0
55

 

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयपुरुष, थोर व्येी यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.२२१८/ प्र.क्र.१९५/२९ दि.२६/१२/२०१८ संदर्भानुसार श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संतांजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. सदर फोटो फ्रेम मिळण्यासाठी श्री संताजी फ्रेम वर्क, परसराम सैंदर, शिंपीगल्ली, तेलीखुंट, नगर. श्री दत्त फ्रेमिंग वर्स, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासमोर, नगर. ओंकार सुपर स्टोअर्स, महाजनगल्ली, नगर किंवा अधिक माहितीसाठी हरिभाऊ डोळसे (मो.९८२२२७१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.