व्यावसायिकाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण

0
53

नगर – व्यावसायिकाला दोन अनोळखी इसमांनी लाकडी दांडयाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडे नऊच्या सुमारास नगर- मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव ब्रिज जवळ घडली. शिवम राजेंद्र उदारे (वय २१ रा. केदारे मंगल कार्यालयाशेजारी, भिंगार) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बोल्हेगाव येथील राजयोग इलेटि ्रक दुकानातून नगर-मनमाड रस्त्याने घरी जात असताना त्यांना ब्रिज जवळ विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्या इसमांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते.

दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीची कॉलर पकडली तर मागे बसलेल्या इसमाने लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण करणारे दोघे अनोळखी त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार नेहुल करीत आहेत.