मुदत संपूनही केडगावमधील विकासकामे अपूर्णच राहिल्याने अखेर वकिलानेच बजावली प्रशासकिय यंत्रणेला ‘नोटिस’

0
75

 

नगर – सा.बां.विभाग महाराष्ट ्र शासनाचे शासन निर्णय नुसार नगर तालुयातील रामा ५८ ते खारे कर्जुने-हिंगणगाव-निमगाव वाघा-केडगाव- बुरुडगाव-वाकोडी-वाळुंज ते रामा५८ (प्रजिमा- १७०) रस्त्यावर कि.मी.१५/२०० मध्ये लहान पुलाचे व जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी २कोटी अंदाजीत खर्चाचे बांधकामास मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार केडगाव वेस ते देवी रोडवर मतकर वस्ती लगत नवीन बांधकाम करणे व पोच मार्गाचे खडीकरण,मजबुतीकरण, डांबरीकरण,मुरुम बाजुपट्टी, कच्चे गटर्सचे काम प्रस्तावित करण्यात आलेले होते.

त्यासाठी तांत्रिक मान्यता र क्कम रु.१,६५,४६,३७६/- चा निधी मंजुर करण्यात आला होता. तदनंतर कार्यकारी अभियंता अहमदनगर सा.बा.विभाग यांचे कार्यालयाकडून१४/१०/२०२१ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता सदरील आदेशान्वये काम सुरु करण्यात आलेले होते.कार्यारंभ आदेशानुसार कामाची मुदत ही १२ महिन्यांची होती.

त्यानुसार १४/१०/२०२२ रोजीच कामाची मुदत संपलेली आहे. तरी देखील काम आजही अपुर्णच आहे. अपुर्ण असल्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या नागरीकांना वर्षभरापासुन प्रचंड धुळीचा त्रास होत आहे. सा.बा.विभागातील ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर नमुद काम पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते सर्वजण आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहेत. सदर कामाच्या बदल्यात १,२१,९४,९४३/- इतया रकमेचे काम अपुर्ण असतानाही बिल अदा करण्यात आलेले आहे. त्यामुळे अ‍ॅड.वैभव कदम यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सा.बां.मंडळ, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदरचे अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे.