चविष्ठ सुशीला

साहित्य-
चुरमूरे (मुरमूरे) – अर्धा किलो
शेंगदाणे – 1 छोटी वाटी
फुटाणे पीठ – 1 वाटी
हिरवी मिरची – 5
जिरे, मोहरी- चिमुठभर
हळद – चिमुठभर
मीठ – चवीनुसार
कांदा – 1 बारीक चिरून
कोथिंबीर- सजावटीसाठी

 कृती –प्रथम एका बाउलमध्ये चुरमूरे (मुरमूरे) २-३ मिनिटे पाण्यात भिजवावे. नंतर भिजवलेल्या चुरमूरे पिळून पाणी काढून टाका. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून तडका येऊ द्या. तडका आल्यानंतर त्यात चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. त्यानंतर त्यात मिरच्या आणि शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या. त्यात हळद टाकून भिजवलेले चुरमूरे टाकून चांगले एकजीव करून घ्या. त्यात मीठ घालून पुन्हा हलवून एकत्र करा. त्याला एक वाफ येवू द्या. वाफ आल्यावर कोथिंबीर टाकून सजवून घ्या. तयार आहे तुमचा सोपा आणि चविष्ठ सुशीला.