संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नागरदेवळे येथे १० ला मोफत नेत्रशिबीर

अहमदनगर- संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त नागरदेवळे येथे शुक्रवार १० रोजी फिनिक्स सोशल फौंडेशन यांचे वतीने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळ येथील संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत आयोजित केलेले आहे. गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.

या शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांना पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची पुणे येथे जाणे, येणे, राहणे,जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे. सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी जालिंदर बोरुडे मो.नं.९८८१८१०३३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा