थंडीत वाढतो धोका!

डोळ्यांच्या संरक्षणासाठी उन्हाळ्यात आपण गॉगल घालतो पण थंडीच्या दिवसात गॉगल घालण्याची गरज सर्वात जास्त असते. हिवाळ्यात डोळ्यांना उन्हाचा त्रास जास्त होतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. हिवाळ्यातही सूर्यकिरणांमधून अतीनील किरणं बाहेर पडत असतात. बर्फ पडत असलेल्या ठिकाणी तर या किरणांमुळे डोळ्यांना जास्त त्रास होऊ शकतो. सूर्याची किरणं बर्फावरून परावर्तीत होऊन डोळ्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे हिवाळ्यातही डोळ्यांना संरक्षण देण्याची गरज असते. हिवाळ्यात सूर्य आकाशाच्या खालच्या भागात असतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या काळात सूर्यकिरणांची तीव्रता उन्हाळ्यापेक्षाही अधिक असते. जास्त काळ उन्हात राहिल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे डोळ्यांच्या वेगवेगळ्या थरांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बाहेर कितीही थंडी असली तरी दिवसा घराबाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावायला हवा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा