नवी थेरपी ठरू शकते वरदान!

लहान मुलांमधल्या इसब किंवा गजकर्ण या विकारावरच्या उपचारांसाठी नवी थेरपी विकसित करण्यात आली आहे. या थेरपीमुळे मुलांमधल्या अस्थमावर उपचार करणं शक्य होणार आहे. ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मिटोलॉजी’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. गजकर्ण आणि अस्थमा या दोन विकारांमधल्या संबंधांचा अभ्यास यामुळे शक्य होणार आहे. ‘ऍटोपिक डर्मेटिटिस’(एडी) हा लहान मुलांमधल्या गजकर्णाचा एक प्रकार आहे. यामुळे भविष्यात अस्थमा होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. एडी आणि अस्थमा या दोन्ही विकारांना घरातले धुलीकण कारणीभूत ठरतात. बेल्जियममधल्या ‘फ्लँडर्स इन्स्टीट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’मध्ये हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अस्थमाची तीव्रता कमी करण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरू शकते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा