सतत गर्भपात होत आहे…

28 वर्षांची महिला असून माझे सातत्याने गर्भपात होत आहेत. आत्तापर्यंत सहा वेळा नैसर्गिक गर्भपात झाला आहे. यामुळे मी खूप निराश झाले आहे. डॉक्टरांनाही यामागचं कारण शोधता आलेलं नाही. सततच्या गर्भपातामागे काय कारणं असू शकतील? मला मार्गदर्शन करा.

उत्तर – सातत्याने होणार्‍या गर्भपातांमागे अनेक कारणं असू शकतात. या कारणांचा शोध घेण्यासाठी तुमची वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. थायरॉइड, मधुमेहासारख्या हार्मोन्सशी संबंधित समस्या, रोगप्र्रतिकारशक्तीशी संबंधित समस्या, गर्भाशयाशी निगडित दोष तसंच अनुवंशिक कारणांमुळेही गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे सर्व चाचण्या केल्यानंतरच यामागचं खरं कारण कळू शकेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा