निर्बंध ठिक पण यापुढे लॉकडाऊन नको, सामान्य जनतेने जगायचे की मरायचे?

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

अहमदनगर- कोरोना ही न संपणारी प्रक्रिया असून, यामुळे निर्बंध असते ठिक असून, यापुढे लॉकडाऊन नको. कोरोनाच्या भितीने पुन्हा लॉकडाऊन केल्यास सर्वसामान्यांनी जगायचे की मरायचे? हा प्रश्‍न उपस्थित करुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना ईमेलद्वारे पत्र पाठविले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाबरोबर जगावे लागणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊ न करण्याची मागणी केली आहे. कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकते. मग आयुष्यभर लॉकडाऊन करायचे का?, डब्ल्यूएचओने सुद्धा कोरोना बरोबर जगावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागे झालेल्या लॉकडाऊनमुळे अद्यापि सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकलेली नाही. सर्वसामान्यांची आर्थिक सोय करुन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा. लॉकडाऊन करा म्हणणारे सरकारी कर्मचारींचा वर्ग आहे. सर्वात आगोदर यांचा पगार बंद करा, म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असते. हातावर पोट असणार्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते. घरात बसून पगार घेणार्‍यांना पगार पाहिजे, मात्र काम नको असल्याने ते लॉकडाऊनची मागणी करत असल्याचा आरोप रोडे यांनी पत्राद्वारे केला आहे.

देश घरात बसून खाणार्‍यांवर नव्हे, तर कष्टकरी, श्रमिकांवर अवलंबून असतो. लॉकडाऊनने काही सिध्द झाले नसून, यापुढेही त्याचा काही फरक पडणार नाही. सर्वसामान्यांची जाणीव ठेऊन कोण उपाशी मरणार नाही, या भावनेने निर्णय घ्यावे. काही दिवसांनी कोरोना सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध कठोर करा, मात्र लॉकडाऊन नकोच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असून, तो त्याप्रमाणे काळजी घेत आहे. त्याला लॉकडाऊन करुन कोरोनाआधी उपाशी मारु नका. अनेक कुटुंबाचे हातावर पोट असून, घरात एक व्यक्ती कमावता आहे. त्याच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे. एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर संपुर्ण कुटुंब उपाशी मरणार आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वसामान्य नागरिक उपासमारीने आत्महत्या करतील. याबाबत गांभीर्याने विचार करावे, अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील. दाखल होणार्‍या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहण्यापेक्षा जेलमध्ये किमान दोन वेळचे जेवण तरी मिळेल, असे पत्रात म्हंटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा