अवैद्य उत्खनन व ब्लास्टिंग थांबवा- ग्रामस्थांनी समज देऊनही ब्लास्टिंग चालू

अहमदनगर – देहरे येथील वांबोरी रोड येथे चालू असलेले अवैद्य उत्खनन थांबवण्याची मागणी गावकर्‍यांनी अनेक वेळा करून देखील बंद झालेले नसून त्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अवैध करिता उत्खनन चालू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोरवेल ब्लास्टिंग केले जात आहे 50 फूट खोल जमिनीत हे ब्लास्टिंग होत असल्यामुळे शेजारी 150 ते 200 मीटर अंतरावर आमचे राहते घर जमिनीला हादरे बसत असून, घरे पडण्याची भीती वाटत आहे. यापूर्वी 8 डिसेंबर 2021 रोजी ब्लास्टिंग केल्यानंतर आमच्या शेतातील घरावर दगड पडले व त्यात एक महिला गंभीर जखमी झाली. त्यामुळे घराच्या वरती व पत्रावर दगड पडून पत्र्याचा शेड तुटला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आमच्या संपूर्ण परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य झाले असून, पिकांचे नुकसान होत आहे. आमच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समज देऊनही ब्लास्टिंग चालू आहे तरी भविष्यात जीवितहानी झाल्यास या सर्व गोष्टीचा जबाबदार कोण? तरी लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करून अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा