पोस्टाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी तिजोरी पळविली

अहमदनगर- पोस्टाचे कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत कार्यालयातील लोखंडी तिजोरी व त्यात असलेले रोख रक्कम, पोस्टल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प चोरुन नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली. याबाबत पोस्ट मास्तर सुमंत प्रभाकर काळे (वय 45, रा.गुंजाळवाडी, ता.संगमनेर) यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.11) पहाटे 2 ते 2.30 च्या सुमारास घारगाव येथील पोस्ट ऑफीसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयात ठेवलेली लोखंडी तिजोरी चोरट्यांनी पळवली. या तिजोरीत काही रोख रक्कम होती. याशिवाय कार्यालयातील पोस्टल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प असा 38 हजार 68 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा